Kokan: राहुल चव्हाणच्या सन्मानार्थ गौरव रॅली

0
18
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ ,
राहुल चव्हाणच्या सन्मानार्थ गौरव रॅली

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l ठाणे l आनंद ग. मयेकर

देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागते.” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रगल्भ विचारविश्वातून आणि देशाबद्दलच्या अथांग, निस्पृह प्रेमातून प्रसवलेले हे विचार, देशाच्या प्रत्येक नागरिकाला सदैव प्रेरणा देत राहतील. मनुष्याला मुख्यत्वे पाच प्रकारच्या ऋणांतून मुक्त होण्याचा शास्त्रोक्त संकेत आहे:https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

  1. देव ऋण – निसर्गातील अनेक घटना आणि वस्तू मानवी जीवनासाठी अनुकूल बनवतात.
  2. ऋषी ऋण – शास्त्र आणि ज्ञान उपलब्ध करून दिले.
  3. पितृ ऋण – जन्म दिला आणि पालनपोषण केले.
  4. देश/समाज ऋण – या भूमीवरील प्रत्येक जीवाने आपल्या जगण्यासाठी, उन्नतीसाठी आणि प्रत्येक गरजेसाठी केलेले सहाय्य.
  5. भूत ऋण – कळत न कळत घडलेले पाप.

वाचक मित्रांनो, मी आनंद ग. मयेकर, वय ६९ वर्षे, ठाण्यात राहणारा, मूळ गाव मालवण. मी माझ्या या लेखनाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अग्नीहोत्र प्रज्वलित करून आणि मनुष्याच्या जीवनातील येणाऱ्या “पाच ऋणां”बद्दल संकेत देऊन, आपल्या देशाने आपल्यावर केलेल्या निर्व्याज प्रेमाची आठवण करून दिली आहे. मी वरील प्रेरणादायी विचार लिहायला प्रवृत्त झालो, त्यामागे खालील सिंधुनगरीच्या बातमीत दडलेले कारण आहे. दि. ६ आणि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी, सिंधुनगरीतील ‘प्रहार डिजिटल’ वृत्तवाहिनीने खालील बातमी प्रसारित केली होती:
“राहुल गौरव रॅली, ७ फेब्रुवारी २०२५ सकाळी ८ वाजता” आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे सीनियर अंडर ऑफिसर राहुल उषा उदय चव्हाण यांना २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय संचालनात आणि फ्लॅग एरियामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला. तसेच फ्लॅग एरियामध्ये राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला तिसऱ्या स्थानावर रँकिंग प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि मालवण तालुक्यासाठी, विशेषतः मालवणवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. राहुल चव्हाण यांचा सन्मान डायरेक्टर जनरल एनसीसी, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि ५८ महाराष्ट्र बटालियन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.

आरडीसी परेड (Republic Day Camp Parade) मध्ये, मालवण तालुक्यातील एक राष्ट्रीय छात्र सेनेचा तरुण सहभागी होण्याचा हा सन्मान मालवणच्या इतिहासात प्रथमच प्राप्त झालेला आहे. ही बातमी मालवणवासीयांसाठी नक्कीच स्पृहणीय आणि अभिमानास्पद आहे! गेल्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर, राहुलचे प्रथमच दिल्लीहून मालवणमध्ये आगमन होत आहे. या निमित्ताने, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राहुलच्या सन्मानार्थ गौरव रॅली आयोजित करण्यात आलेली आहे.

ही बातमी समजल्यावर, माझ्यासारख्या कट्टर सिंधुवासीयाचा छाती अभिमानाने फुगून आली! गौरव रॅलीच्या या अपूर्व सोहळ्याचा मी प्रत्यक्षदर्शी होऊ शकलो नाही, याचे वैफल्य वाटतेच. पण मालवणी मातीशी नाळ जुळलेल्या मला चि. राहुलच्या कर्तृत्वाबद्दल आणि त्याच्या गौरव सोहळ्याबद्दल आपले आशीर्वादरूपी अभिप्राय लिहून राहुलला पाठवावे अशी स्फूर्ती झाली. सिंधुदुर्ग, म्हणजे आमची सिंधुनगरी, जिच्या विस्तीर्ण सागरकिनाऱ्यांनी आणि विलोभनीय निसर्गसंपत्तीने शोभिवंत झालेल्या या नगरीला साहित्य, वाङ्मय, चित्रकला, शिक्षण, क्रीडा, संगीत आणि साहस अशा विविध क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाने यशाचे तेजोवलय निर्माण केलेले अगणित माणिक-मोती लाभले आहेत. त्यांनी आकाशाला गवसणी घालणारे यश संपादन करून स्वतःची कीर्ती प्रदीप्त केलीच, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात वारंवार मानाचे तुरे रोवून आपल्या जिल्ह्याच्या गौरवगाथा विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवल्या आहेत.

अशाच माणिक-मोत्यांच्या माळेत आणखी एका रत्नाची भर पडली, जेव्हा मी ‘प्रहार डिजिटल’ पत्रकातून एका देशप्रेमी, राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणाच्या अद्भूत आणि उत्तुंग भरारीबद्दलची बातमी वाचली. तो आहे मालवणचा सुपुत्र चि. राहुल उषा उदय चव्हाण. चि. राहुल, तू संपादन केलेल्या या हिमालयाएवढ्या उत्तुंग यशाबद्दल तुझे अंतःकरणपूर्वक अभिनंदन! राहुलचे प्रेरणादायी ध्येय: सैनिकी प्रशिक्षणाची ओढ असल्याने, चि. राहुलने या क्षेत्राचा संपूर्ण आणि सखोल अभ्यास करून तत्संबंधी प्रयत्न सुरू केले.

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) बद्दल संक्षिप्त माहिती:
एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स. ही भारतीय सशस्त्र दलांची युवा शाखा आहे. एनसीसीची स्थापना २६ नोव्हेंबर १९४८ रोजी करण्यात आली होती. एनसीसीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

एनसीसीचे उद्दिष्ट: तरुणांमध्ये शिस्त, चारित्र्य, देशप्रेम, कॉम्रेडशिप, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, साहसाची भावना आणि निःस्वार्थ सेवेचे आदर्श विकसित करणे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे.

एनसीसी कॅडेट्सची कर्तव्ये:

परेड आणि रोल कॉल दरम्यान वेळेवर हजर राहाणे. उच्च पदांच्या आदेशांचे पालन करणे. शिबिराच्या उपक्रमांमध्ये पूर्ण उत्साहाने सहभागी होणे. नेहमी योग्य केस कापणे आणि स्वच्छ आणि योग्य पॅटर्नचा गणवेश घालणे.

एनसीसी बद्दल वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींचा चि. राहुलने सर्वांगाने विचार करून, त्याच्या शालेय आणि महाविद्यालयीन छात्र सेना पथकात स्वतःचे नाव दाखल करून संबंधित चाचण्यांमध्ये चमक दाखवून निवड प्रक्रियेत उत्तीर्ण झाला. लेफ्टनंट डॉ. प्रा. एम. आर. खोत यांच्या सजग मार्गदर्शनाखाली, पुढील प्रशिक्षण नित्यनेमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू केले.

चि. राहुलच्या डोक्यात एकच विचार होता, की छात्र सेनेत दाखल होऊन “एकता आणि शिस्त” या एनसीसीच्या ब्रीदवाक्याला स्मरून आणि कठोर प्रयत्न करून एक उत्कृष्ट नॅशनल कॅडेट बनायचे आणि देशसेवा करायची. त्याच्या डोळ्यात एक तेजस्वी स्वप्न होते, की प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी व्हायचे.

या विचार-स्वप्नांच्या पायघड्यावरून मार्गक्रमणा करीत, ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, ओरोस, सिंधुदुर्ग येथे गणतंत्र संचालन शिबिराच्या निवड चाचणीत यथोचित यश प्राप्त करून, पुढे कोल्हापूर विभागीय स्पर्धेत निवड संपादन केली. अशा मजलादरमजल यशाच्या पायऱ्या चढत, अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि पुणे येथे पार पडलेल्या प्री-रिपब्लिक डे कॅम्पमध्ये आपले अव्वल स्थान बळकट करून दिल्ली येथील मुख्य गणतंत्र दिन शिबिरात सहभागी होण्याचे स्वप्न साकार केले. आणि प्रथमच, सिंधुदुर्ग-मालवणचा हा सुपुत्र, राजधानी दिल्लीच्या राजपथ/कर्तव्यपथावर, २६ जानेवारी २०२५ रोजी, म्हणजेच प्रजासत्ताक दिनी, साजरा होणाऱ्या भव्य संचालनात, आपल्या मनीच्या देशनिष्ठेचे/श्रद्धेचे प्रतीक दर्शविण्यासाठी मार्गक्रमित झाला!

ज्या अतुलनीय आणि अद्वितीय मानाचा मानकरी चि. राहुल बनला आहे! राहुलच्या या अभिनंदनीय यशामागे त्याने मनाशी बाळगलेले ४C आणि ४D फॉर युवर सक्सेस: नव्या पिढीतील तरुण/तरुणींना सदैव मार्गदर्शक ठरतील:

  • ४Cs: Conviction (दृढ विश्वास), Clarity (स्पष्टता), Commitment (वचनबद्धता) आणि Consistency (सातत्य).
  • ४Ds: Desire (इच्छा), Dedication (समर्पण), Determination (निश्चय) आणि Discipline (शिस्त).

ही C आणि D ची तत्त्वे अंगिकारून आणि त्यानुसार कटाक्षाने अनुसरण करून, राहुलने आपल्या ध्येयाच्या अवकाशावर यशाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य चितारले आहे!

चि. राहुलच्या या गगनभेदी यशामागे, युवा पिढीला घडविणारे जे कर्मनिष्ठ-ध्येयनिष्ठ दीपस्तंभ आहेत, त्यांचा येथे उल्लेख करणे फार जरुरी आहे:

  1. ५८ एनसीसी बटालियन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल श्री. एम. आर. खोत (मार्गदर्शक).
  2. सुभेदार मेजर श्री. दिनेश गेडाम.
  3. एनसीसी फर्स्ट ऑफिसर कर्नल श्री. दीपक दयाल.

रिपब्लिक डे कॅम्प परेडमधील सहभागासाठी, चि. राहुलचे मनोबळ दृढ करण्यासाठी, स. का. पाटील महाविद्यालयाचे संचालक मंडळ, प्राध्यापक वृंद, सहकारी तथा हितचिंतक यांचे स्पृहणीय आणि असीम सहाय्य सदैव स्मरणीय आणि अनुकरणीय राहील आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, मला पुढील दोन शिल्पकारांच्या नावाचा उल्लेख करणे समयोचित आहे, ते म्हणजे चि. राहुलचे पालक: श्री. उदय चव्हाण आणि सौ. उषा चव्हाण. या महत्त्वाया महत्त्वाच्या शिल्पकारांनी, चि. राहुलच्या यशोमंदिरासाठी त्यागपूर्ण पाठबळ दिले आहे.

ज्या ध्येयाने (गणतंत्र दिन संचालन सहभाग) चि. राहुल ध्येयवेडा झाला, त्या ध्येयामागील उदात्तता समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताच्या प्रजासत्ताकात सन १९५० पासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा होणारा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.

भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येऊ लागला. दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले अमूल्य प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.

त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच, राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

बीटिंग रिट्रीट सोहळ्याला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोपही म्हटले जाते. प्रजासत्ताक दिनानंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे २९ जानेवारीच्या संध्याकाळी, बीटिंग रिट्रीटचा सोहळा आयोजित केला जातो. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील शूर मुला-मुलींना दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात १९५७ साली झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले जाते.

आपण सारे, आपल्या भारत मातेचे ऋणनिर्देश करून पुढील प्रार्थना करूया:
“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। आम्हा लेकरांवर सदैव मातृप्रेमाचे छत्र धरणाऱ्या मातृभूमि! मी तुला सदैव साष्टांग दंडवत अर्पण करतो. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥”

अशा भव्य दिव्य सोहळ्यामध्ये, आपला सिंधुसुपुत्र चि. राहुलने प्रजासत्ताक दिनी झालेल्या अभूतपूर्व संचालनात सहभागी होऊन, मालवणचे, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, आपला मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, त्यासाठी या सिंधुपुत्राला, म्हणजेच चि. राहुलला, तमाम सिंधुवासीयांतर्फे या मालवणी वृद्ध काकाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा आणि त्याच्या भविष्यातील प्रत्येक सृजनात्मक भरारीसाठी उदंड आशीर्वाद!या महत्त्वाच्या शिल्पकारांनी, चि. राहुलच्या यशोमंदिरासाठी त्यागपूर्ण पाठबळ दिले आहे.

ज्या ध्येयाने (गणतंत्र दिन संचालन सहभाग) चि. राहुल ध्येयवेडा झाला, त्या ध्येयामागील उदात्तता समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारताच्या प्रजासत्ताकात सन १९५० पासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा होणारा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.

भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येऊ लागला. दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले अमूल्य प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.

त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच, राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात.

बीटिंग रिट्रीट सोहळ्याला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोपही म्हटले जाते. प्रजासत्ताक दिनानंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे २९ जानेवारीच्या संध्याकाळी, बीटिंग रिट्रीटचा सोहळा आयोजित केला जातो.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील शूर मुला-मुलींना दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात १९५७ साली झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले जाते.

आपण सारे, आपल्या भारत मातेचे ऋणनिर्देश करून पुढील प्रार्थना करूया:
“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्। आम्हा लेकरांवर सदैव मातृप्रेमाचे छत्र धरणाऱ्या मातृभूमि! मी तुला सदैव साष्टांग दंडवत अर्पण करतो. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥”

अशा भव्य दिव्य सोहळ्यामध्ये, आपला सिंधुसुपुत्र चि. राहुलने प्रजासत्ताक दिनी झालेल्या अभूतपूर्व संचालनात सहभागी होऊन, मालवणचे, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, आपला मालवण तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, त्यासाठी या सिंधुपुत्राला, म्हणजेच चि. राहुलला, तमाम सिंधुवासीयांतर्फे या मालवणी वृद्ध काकाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा आणि त्याच्या भविष्यातील प्रत्येक सृजनात्मक भरारीसाठी उदंड आशीर्वाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here