Kokan: रेडी येथील ऐतिहासिक यशवंतगडावर फडकवला कायमस्वरुपी ध्वज

0
20
रेडी, यशवंतगड,ध्वज

वेंगुर्ला प्रतिनिधी– रेडी येथील ऐतिहासिक यशवंतगडावर सकल हिदू समाजा तर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी किल्यावर कायम स्वरुपी भगवा ध्वज फडकवण्यात आला. ध्वज पूजन तसेच छत्रपति शिवाजी महाराजांच्या आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजनही केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-दहावी-परीक्षेत-वेंगुर्ल/

      ध्वजमंत्र, गारद, तोफेची सलामी, स्पूर्तीगीत, मिरवणुकीत ढोल पथकाचे वादन तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक यामुळे कार्यक्रमास रंगत आली. प्रमुख अतिथी म्हणून आत्माराम बागलकर यांनी ध्वज फडकवला, शिवमाऊली ढोल ताशा पथक रेडी यांनी वादन केले. मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक रूद्र नाईक व चितफल नाईक यांनी केले तसेच विनायक खवणेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावाचे रेडी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

फोटोओळी – शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून यशवंतगडावर कायम स्वरुपी भगवा ध्वज फडकवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here