Kokan: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा खर्च संनियंत्रण समितीने मतदार संघासाठी दरपत्रक निश्चित

0
30
शाकाहारी १००, चिकन थाळी १६० रुपये, दर निश्चित
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा खर्च संनियंत्रण समितीने मतदार संघासाठी दरपत्रक निश्चित

शाकाहारी १००, चिकन थाळी १६० रुपये, दर निश्चित

रत्नागिरी– रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा खर्च संनियंत्रण समितीने या मतदार संघासाठी दरपत्रक निश्चित केले आहे. उमेदवारांसाठी वस्तू व सेवांच्या दरही ठरविण्यात आले आहेत. यामध्ये शाकाहारी थाळी १०० रुपये, चिकन थाळी १६० रुपये, मटण थाळी २३० दर मान्य करण्यात आला आहे. एक लिटर शितपेयासाठी ६० रुपये, तर छोट्या झेंड्यासाठी १२ रुपये, ढोल-ताशे १००, बेंजो १५००, लहरी फेटा ५०, टोपी १० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अन्वय-सापळे-इंग्रजी-माध्/

जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने उमेदवारांकडून खर्च तपशील मागवण्यासंदर्भात दरपत्रकाची निश्चिती केली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे दरांची रचना करण्यात आली आहे. लहान हार १०० रुपये, लहान गुच्छ ७० रुपये, नारळाची किंमत २० रुपये ठरवून देण्यात आली आहे. पाणी बॉटल ६.४५ ते १२.५० रुपये आहे. १००० हजार फटाक्यांच्या माळीसाठी ३०० रुपये, तर १० हजाराच्या फटाक्यांच्या माळीसाठी २५०० रुपये एवढा दर ठरवला आहे. मल्टीशॉट कॅकर्स ५० शॉटस् खोक्यासाठी १००० रुपये, वातानुकूलित हॉटेल खोलीसाठी १२०० रुपये, तर बिगर वातानुकूलित खोलीसाठी ८०० रुपये प्रतिदिन दर ठरवून देण्यात आला आहे.

सभेसाठी मंगल कार्यालय भाड्याने घेण्यासाठी २० हजार रुपये प्रतिदिन आहे. जाहिरातीसाठी विविध दर ठरवून देण्यात आले आहेत. बीएसएनएलकडून ९ हजार ५००, मेसेजसाठी १००० रुपये अशाप्रकारे दर ठरवण्यात आले आहेत. आकाशवाणी, दूरचित्रवाणीसाठीही दर ठरवण्यात आले आहेत. शिसपेन्सिलच्या १० नगासाठी ४८ रुपये, तर छोट्या लखोट्यासाठी १०० रुपये शेकडा असा दर लागू करण्यात आला आहे.

पोवाडा पथकासाठी ५ हजार रुपये, तर ढोलपथक १००० रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन दर निश्चित करण्यात आला आहे. माईक सिस्टीम ३४७३ प्रतिदिन, पोहे, उपमा असा नाश्ता २५ रुपये प्रतिप्लेट, तर वडापाव व पॅटीससाठी १५ रुपये एवढी रक्कम मान्य करण्यात आली आहे. मटण थाळीसाठी २३० रुपये एवढी कमाल रक्कम मान्य करण्यात येईल. मच्छी चाळीसाठी केवळ १९० रुपये एवढीच रक्कम ठरवण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या वस्तू व सेवेच्या दरांची यादी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी मंजूर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here