रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली पहिली यादी आज जाहीर केली आहे. सांगली जागेचं काय होणार याबद्दलची चर्चा आता थांबली आहे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला आली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी मधून विनायक राऊत आणि रायगड मधून आनंत गिते यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेने कोणाकोणाला उमेदवारी दिली आहे यावर आपण एक नजर टाकूया….https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-श्री-आनंद-महिंद/
लोकसभा निवडणूक २०२४
१) बुलढाणा : प्रा. नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ – वाशिम : संजय देशमुख
३) मावळ : संजोग वाघेरे – पाटील
४) सांगली : चंद्रहार पाटील
५)हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर
६) संभाजीनगर : चंद्रकांत खैरे
७) धारशीव : ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी : भाऊसाहेब वाघचौरे
९) नाशिक : राजाभाऊ वाजे
१०) रायगड : अनंत गिते
११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी : विनायक राऊत
१२) ठाणे : राजन विचारे
१३) मुंबई – ईशान्य : संजय दिना पाटील
१४) मुंबई – दक्षिण : अरविंद सावंत
१५) मुंबई – वायव्य : अमोल कीर्तिकर
१६) परभणी : संजय जाधव
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीने ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.