Kokan: “वग महाराष्ट्राचा “या नाट्याचा प्रयोग उद्या सावंतवाडीत. बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन- अर्चनाताई घारे परब

1
9
'वग महाराष्ट्रा' चा नाट्यप्रयोग,
'वग महाराष्ट्रा' चा नाट्यप्रयोगास उपस्थित राहण्याचे अर्चनाताई यांचे आवाहन

⭐ खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे वगनाट्य – ⭐ नाट्याचा नाट्यप्रयोग शनिवारी सकाळी 9.30 वा. सावंतवाडीत

सावंतवाडी- : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा गांधी चौक, सावंतवाडी येथे दाखल होत आहे. त्यानिमित्ताने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9.30 वा. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कहाणी सांगणारे, सध्याच्या राजकीय गोंधळावर भाष्य करणारे तसेच नामांकित TV कलाकारांचा अभिनय असलेले, संतोष पवार दिग्दर्शित ” वग महाराष्ट्राचा ” या नाट्याचा प्रयोग होणार आहे. तरी या प्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मच्छिमार-महामंडळासाठी/

1 COMMENT

  1. […] सिंधुदुर्ग- पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी शिफारस केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा कामांना भरघोस असा निधी प्राप्त झालेला आहे. १६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी या योजनेतून मंजूर झालेल्या सहा रस्त्यांसाठी प्राप्त झाला आहे. अनेक ग्रामीण भागाला जाण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था नव्हती, त्याचप्रमाणे या रस्त्यांमुळे अनेक गाव एका दुसऱ्याला थेट जोडले जाणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-वग-महाराष्ट्राचा-या-नाट/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here