🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सावंतवाडी,l अभिमन्यु वेंगुर्लेकर:
वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे निवेदन सुपूर्द करताना उपसरपंच भरत गावकर सोबत ग्रामस्थ अनंत परब सिताराम गावकर आदी
सोनुर्ली गावातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे लाल तोंडाच्या माकडांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे गेले कित्येक वर्ष हा प्रकार सुरू असून वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी माकड पकड मोहीम सोनुर्ली गावात राबवावी अशी मागणी उपसरपंच भरत गावकर यांनी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याजवळ केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-इंडियन-ऑइलमध्ये-457-जागांस/
याबाबतचे निवेदन त्यांनी आज सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना सुपूर्त केले यावेळी सोनुर्ली ग्रामस्थ अनंत परब, सिताराम गावकर आधी उपस्थित होते. उपसरपंच श्री गावकर यांनी दिलेल्या म्हटले की सोनुर्ली गावात लाल तोंडाच्या माकडांचा उपद्रव केले कित्येक वर्ष सातत्याने सुरू आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नारळ केळी काजू यांच्या बागा आहेत, याशिवाय चवळी उडीद कुळीथ आदींसारखी नगदी पिके ही शेतकरी घेतात परंतु जंगल भागात राहणारी लाल तोंडाची माकडे या शेतीची मोठ्या प्रमाणात नासधुस करत आहेत, नारळाचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान माकडांकडून होत आहे यामुळे आर्थिक नुकसानीसह शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वन विभागाच्या माध्यमातून अलीकडेच माकड पकड मोहीम हाती घेण्यात आली आहे उपद्रवी माकडांना वनविभागाच्या अधिकृत टीमकडून माकडांना जेरबंद करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जात आहे, असेच मोहीम सोनुर्ली गावामध्ये तात्काळ राहून उपद्रवी लाल तोंडाच्या माकडांना जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा जेणेकरून गेले कित्येक वर्षाची शेतकऱ्यांच्या शेती बागायतीची होणारे नुकसानी काहीही थांबेल तरी लवकरात लवकर हे पकड मोहीम राबविण्यात यावी असे मागणी गावकर यांनी केली आहे.