प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
वळीवंडे – वळीवंडे गावाच्या रस्त्याचे काम चालू आहे. सगळीकडे बांधकामाचा निकृष्ट दर्जा दिसून येत असतानाच वळिवंडे गावचे सरपंच श्री.दत्तू सांवत स्वतः हजर राहून रस्त्याचे बांधकाम बघत आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-निरोम-गावचे-आधारस्तंभमा/
आपल्या गावाच्या ग्रामस्थांना सुविधा कशा उत्कृष्ट दर्जाच्या मिळतील याकडे ते स्वतः लक्ष देतात. त्यामुळेच वळिवंडे गावाच्या रस्त्याचे काम चालू असतांना हा रस्ता कसा दर्जेदार होईल यासाठी ते जातीने बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित राहून काम करून घेत आहेत. श्री.दत्तू सांवत यांचे काम पाहता त्यांच्यासारखा सरपंच आणि लोकप्रतिनिधी मिळावा असे ग्रामस्थ म्हणत आहेत.