दापोली- दापोली तालुक्यातील वाकवली येथील डाॅ. वि. रा. घोले माध्यमिक विद्यालय व पद्मश्री अण्णासाहेब बेहेरे कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच विविध जीवन कौशल्ये प्राप्त करण्यासाठीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील आय.ए.पी.ए. या संस्थेच्या कार्यकर्त्या असलेल्या अश्विनी वैद्य यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये विषयक कृतीयुक्त मार्गदर्शन केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-कोमसाप-दापोलीचा-वाचन-प्र/
विद्यालयाचे प्राचार्य अरुण सिदनाईक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी अश्विनी वैद्य यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना भेडसावणारे ताणतणाव, चिंता, गैरसमज, अहंगंड, न्यूनगंड, नकारात्मकता, नैराश्य, व्यसनाधिनता, आत्मविश्वासाचा अभाव, पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे, पालकांचे अज्ञान, आवश्यक आहार, वर्तन, आरोग्य आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.