दापोली- दापोली तालुक्यातील वाकवली येथील डाॅ. वि. रा. घोले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेट उपक्रमांतर्गत जवळच्या साखळोली गावातील पितांबरी ॲग्रो टुरिझम या कृषी पर्यटन केंद्रास भेट देऊन तेथील कृषी पर्यटनाचा आनंद घेतला. https://sindhudurgsamachar.in/kokan-मा-कें-मं-रत्नागिरी-सिंधु/
विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण सिदनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पीतांबरी ॲग्रो टुरिझम येथील निसर्ग, वनौषधी, विविध प्रकारचे बांबू, कमळे व अशा वनस्पतींपासून तयार होणारी कृषी व औषधी उत्पादने याबाबत पितांबरीचे दुर्गेश पवार यांनी रंजक व उपयुक्त माहिती सांगितली. या सहलीतून विद्यार्थ्यांनाही रंजक व उपयुक्त माहिती मिळाली. क्षेत्र भेटीसाठी असे ठिकाण निवडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत कदम यांनी पितांबरीचे व्यवस्थापक सागर साळवी यांचे आभार मानले.