कुडाळ /मनोज देसाई – जिल्ह्यातील भक्तांना ललामभुत असलेल्या, वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा अयोध्या येथील श्री रामललाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे यंदाची रामनवमी विशेष आहे. गेल्या २२ जानेवारी रोजी वालावलला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करण्यात आले होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-जयभीम-युवक-मंडळ-कुडाळ-आय/
यंदा श्री देव लक्ष्मी नारायण परिसर स्वच्छ व आकर्षक रीतीने सजवला आहे. रामनवमी उत्सवादिवशी (ता.१७ एप्रिल) तसेच, महाएकादशी ,१९ एप्रिल रोजी ( यात्रोत्सव) एसटी तसेच खासगी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.कै. मनोरमा चौधरी ट्रस्ट तर्फे मंदिरात मोफत सरबत व्यवस्था करण्यात येते. रामनवमीचा महोत्सव १४ दिवस होणार असल्याने, वालावल ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, वालावल,प्रशासन आदी सज्ज झाले आहे.
गुढीपाडवा ते २२ एप्रील (हनुमान जयंती प्रारंभ) पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव लक्ष्मी नारायणादी स्थानिक सल्लागार समिती चे सदस्य, अध्यक्ष स़ंग्राम देसाई, वालावल सरपंच श्री.राजेश प्रभु, तसेच ग्रामस्थ, आदींच्या वतीने करण्यात आले आहे.