🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मालवण-
21 व्या शतकातील विकसित व स्वच्छ, सुंदर मालवण शहर बनवण्यासाठी आमदार म्हणून मी प्रयत्नाशील आहे. अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक पदाला साजेसे योगदान द्यावे. मागच्या दहा वर्षात काहीच झाले नाही मात्र आता कारणे नको गती पकडा. जिद्दीने कामाला लागा. विकासनिधीचे प्रस्ताव तयार करा. शासनस्तरावरून अधिकाधिक विकासनिधी आणण्यासाठी मी सतत प्रयत्नाशील राहणारच आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषद येथे बोलताना केले. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
आमदार नीलेश राणे यांनी मालवण शहरातील विकासकामांसदर्भात शुक्रवारी सकाळी नगरपालिका सभागृहात प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेताना रखडलेले विकासप्रकल्प, प्रस्तावित विकास प्रकल्प, नादुरुस्त प्रकल्प यांची माहिती घेतली. तसेच शहर स्वच्छता, भटके कुत्रे, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट, कर आकारणी, सीआरझेड, शहर विकास आराखडा, बचतगट, आदी सर्वच विषयांवर पालिकेची स्थिती आणि शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ यावर सविस्तरपणे चर्चा केली. मालवणवासियांना स्वच्छ व सुंदर शहराचे अभिवचन देण्यात आलेले असून यापुढे ज्या अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी आहे, त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे.
पुढील पाच वर्षात शहरवासियांना, पर्यटकांना आपण काय सेवा सुविधा देणार, देत असलेल्या सेवा सुविधा योग्य प्रकारे आहेत कां? यावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. अधिकारी वर्गाने आपल्या जबाबदारीकडे अधिक लक्ष द्यावे. कामात हयगय आणि कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. नव्याने अनेक सुविधा, निधी तरतूदि लवकरात लवकर केल्या जातील. सध्य स्थितीत उपलब्ध असलेल्या व्यवस्थेमध्ये चांगल्यात चांगले काम करण्याची मानसीकता सर्वांनी बनवावी, असेही आमदार निलेश राणे यांनी अधिकारी वर्गांना सांगितले.