Kokan: विकासकामांच्या मुद्दयावर प्रचार यंत्रणा राबवणार – उमेश येरम

1
53
शिवसेनेच्या बैठकीत उमेश येरम यांनी मार्गदर्शन केले.    
विकासकामांच्या मुद्दयावर प्रचार यंत्रणा राबवणार - उमेश येरम

वेंगुर्ला प्रतिनिधी– सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आतापासूनच प्रचाराच्या कामाला लागावे. हा मतदार संघ शिवसेनेचा असून उमेदवार शिवसेनेचाच मिळावा असा सर्वांचाच आग्रह आहे. मात्र महायुतीचे पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराचे आपल्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम कारायचे आहे. तसेच मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या कोट्यावधींच्या विकासकामांचा मुद्दा घेऊन महायुतीच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा आपल्याला राबवायची असल्याच्या सूचना शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी पदाधिकारी यांना दिल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-रांगणा-गडाला-८५-जणांची-भे/

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरातील १७ प्रभागातील सर्व शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, महिला शहर बूथ प्रमुख, महिला संघटिका यांची सप्तसागर अपार्टमेंट मधील शिवसेना कार्यालयात शहरपमुख उमेश येरम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी युवासेना शहर प्रमुख संतोष परब, महिला शहर संघटिक श्रद्धा बाविस्कर-परब, अल्पसमख्यांक महिला शहर संघटिका शबाना शेख, जेष्ठ शिवसैनिक आपा मांजरेकर, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, महिला उपशहर संघटिका मनाली परब यांच्यासहित शाखाप्रमुख रसिका राऊळ, प्रभाकर पडते, संजय परब, राजू परब, मनोज पांगम, बुथप्रमुख वासुदेव उर्फ बाळा परब, संजना पिंगुळकर, कमलाकर वेळकर, शिल्पा गोळम, वैशाली रणभिसे, राधा बागवे, गीतांजली गावकर, आपा परब, महेंद्र पालव, विद्या परब आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-रांगणा-गडाला-८५-जणांची-भे/

या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरातील प्रचार यंत्रणा कशाप्रकारे राबवण्यात यावी, महायुतीच्या माध्यमातून शहरात झालेली विकासकामे मतदारांपर्यंत पोचवणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर महायुतीच्या उमेदवाराचे सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना येरम म्हणाले की, शहरात अनेक विकासकामे शिवसेना व भाजपच्या माध्यमातून झाली आहेत. मंत्री केसरकर यांनी कोट्यावधींचा निधी दिल्याने रस्त्यांचे डांबरीकरण,  सिधुरत्नच्या माध्यमातून रोजगार, बंदर सुशोभिकरणासाठी ४५ कोटी निधी, मांडवी खाडी येथे फ्लोरिग रिसॉट, रामेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटीचा निधी दिला आहे. अनेक वर्षे रखडलेला मांडवी खाडीतील वाळू काढण्याचा प्रश्न मार्गी लागला असून बंधा-याचे काम सुरू झाले आहे. ही सर्व कामे मंजूर करून आणण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचा मोठा वाटा आहे. भविष्यात शहरात बरीच विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे नाथ पै कलादालन केंद्र हे काम पूर्ण होऊन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे शहरातील नागरिक, मच्छिमार बांधव, शेतकरी हे निश्चितच दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठाम राहतील व याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीला महायुतीला होईल यात शंका नाही. तसेच शिवसेना किवा भाजप पक्षातील कोणताही उमेदवार असता तरी त्यांना निवडून आणण्यासाठी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार असल्याचे श्री.येरम यांनी सांगितले.

फोटोओळी – शिवसेनेच्या बैठकीत उमेश येरम यांनी मार्गदर्शन केले.    

1 COMMENT

  1. […] महाड -तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविणारे शहीद भाई संगारे यांचे महाड मध्ये स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करूया . ज्यांच्या शब्दाशब्दांत असायचे अंगारे, ते होते भाई संगारे अशी काव्यमय सुरुवात करून तरुणांच्या मानत क्रांती ची ज्योत पटविणारे शहीद भाई संगारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाड क्रंतीभुमीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करुया; शहीद भाई संगारे यांच्या 25 व्या स्मृतिदिनी आज सर्व जुने पँथर एकत्र आले आहेत. आपले आता पक्ष वेगवेगळे असले तरी समाज म्हणून आपण नेहमी एकत्र असले पाहिजे अशी सामाजिक ऐक्याची साद घालत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत शहीद भाई संगारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-विकासकामांच्या-मुद्दया… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here