विजयदुर्ग – कै. विष्णू सारंग प्रतिष्ठान आणि एस एस पी एम हॉस्पिटल, पडवे यांच्यावतीने आज विजयदुर्ग येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. काही व्यक्ती शरीराने अंत पावतात पण विचाराने आणि आठवणीने अमर असतात. त्यापैकी एक म्हणजे विष्णू सारंग यांना देवाज्ञा 23 एप्रिल 2021 झाली परंतु सामाजिक जाण, इस दिल से उस दिल तक असा मित्रांचा प्रचंड मोठा समुदाय आणि सतत उन्नतीचे विचार, प्रशासकीय कामांची ही चांगली ओळख या सगळ्यामुळे विष्णूचा जीवन प्रवास थांबला असला तरी त्याचे विचार हे अमर झाले आहेत आणि म्हणूनच विष्णू सारंग प्रतिष्ठानच्या वतीने अशा सामाजिक चळवळी चालू आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-निलेश-राणेंचे-ते-ट्विट-ब/
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच अवयवासाठी किंवा एकाच रोगासाठी हे शिबिर आयोजित केले नव्हते. तर गायनॅक प्रॉब्लेम्स पासून ईसीजी पर्यंत सर्व रोगांच्या प्राथमिक चाचण्या करून कुठलाही फोर्स न करता उपचारासाठी लाभार्थ्यांना स्वातंत्र्य देण्यात आले. परंतु गरज पडल्यास तात्काळ संपर्क करण्यास सांगण्यात आले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री.रवि राणे , दिपक करंजे, राजकुमार सारंग, तुषार पडेलकर,करण आळवे, रोहित राणे, सुप्रिया आळवे. वृद्धी सारंग यांनी परिश्रम घेतले दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे आभार यांनी मानले. यामध्ये एकूण 68 जणांनी भाग घेतला. रामचंद्र सारंग मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते . विष्णू सलाम तुमच्या कार्याला