⭐चारवेळा ना बाद..ना लाॅस..मंत्री पदाचा कप पुन्हा सावंतवाडीतच –
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/सावंतवाडी ता.२४-:
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी चौकार मारत जे आतापर्यंत कोणालाही शक्य झाले नाही ते करून दाखवले सावंतवाडी मतदार संघातून ते चौथ्यांदा आमदार झाले.. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा सलग तीन वेळा पराभव केला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-अनिकेत-पटवर्धन-यांनी-विज/
विरोधकांनी आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघाचे वातावरण निर्माण केले असताना देखील, या मतदार संघातील जनतेचे भाई वरचे प्रेम काही कमी झालेले नाही हेच त्यांनी दाखवून दिले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी या मतदारसंघात विविध प्रश्न मार्गी लावले असून, विकासकामे देखील केली आहेत. तर काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्याचमुळे येथील जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला असून, त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करत आपले प्रेम दिले आहे.
एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सावंतवाडी नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, सावंतवाडीचे नगराध्यक्ष, आणि आता सलग चार वेळा आमदार त्यातील दुसऱ्या टर्म मद्ये गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, तिसऱ्या टर्म मद्ये अडीच वर्ष कॅबिनेट शिक्षण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री, आणि आता पुन्हा एकदा आमदार त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा त्यांना मोठे मंत्रीपद नक्कीच मिळेल यात शंका नाही.