Kokan: विज्ञान प्रदर्शन समारंभात चंद्रनगर शाळेचा गौरव

0
22
विज्ञान प्रदर्शन,
विज्ञान प्रदर्शन समारंभात चंद्रनगर शाळेचा गौरव

दापोली- दापोली तालुक्यातील नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे आयोजित केलेल्या दापोली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन व स्वागतपर समारंभात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत दापोली तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरचा समारंभपूर्वक गौरव करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मा-श्री-अनिलजी-पवार-साहे-2/

दापोली पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी दिलीप मर्चंडे, गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र सांगडे, मांदिवली गावच्या सरपंच तुळसा जाधव, नॅशनल हायस्कूल मांदिवली संस्थेचे अध्यक्ष उस्मान खोतू मालवणकर, उपाध्यक्ष अजिज सावंत, सचिव अब्दुल खांचे, स्कूल कमिटी चेअरमन नूर मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते. चंद्रनगर शाळेसाठी दापोली शिक्षण प्रभागाचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, केंद्रप्रमुख प्रवीण काटकर, चंद्रनगर शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर, विद्यार्थी सांची मिसाळ, श्रेयश शिगवण यांनी हा सन्मान स्वीकारला.

दापोली तालुकास्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल चंद्रनगर शाळेचा सन्मान केल्याबद्दल चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, उपाध्यक्ष सुनील रांगले, चंद्रनगर शाळेतील शिक्षिका मानसी सावंत, रेखा ढमके, शिक्षण कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सदानंद मिसाळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन मुळे आदी अनेकांनी आभार व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here