🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l लांजा l राहुल वर्दे-
काल राजापुर लांजा तालुक्यातील परीसरात विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी मुसळधार पावसात बचावासाठी झाडाखाली उभ्या असलेल्या युवकांवर विज कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-देवस्थान-जमिनीची-खरेदी/
पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार राजेश चिमाजी जाधव 45 वर्ष व समीर चंद्रकांत पवार 35 दोन्ही राहणार गोविळ बौध्दवाडी अशी दोघांची नावे असून ते मुंबई हुन गोविळ येथे आले असता याच दरम्यान विजांच्या कडकडसह पाऊस कोसळत होता. विजा अधिक चमकू लागल्यामुळे झाडाखाली थांबले असताना विज अंगावर पडल्याने राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून समीर पवार जखमी झाले आहेत.
अधिक माहितीनुसार, लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले राजेश चिमाजी जाधव आणि समीर चंद्रकांत पवार हे दोघे बुधवारी सकाळी मुंबईहून मोटारसायकलने गावी यायला निघाले होते. सायंकाळी ते गोविळ येथे पोचले. पण मोटरसायकलने आपल्या घरी गोविळ बौद्धवाडी दिशेने जात असताना अचानकपणे विजांचा गडगडासह पाऊस कोसळू लागल्याने हे दोघेही एका झाडाखाली आडोशाला उभे राहिले. याच दरम्यान ५.३० वाजता विजांचा प्रचंड कडकडाट पाऊस सुरू झाला. यावेळी वीज झाडांच्या बाजूला पडली. यात ४५ वर्षीय राजेश चिमाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर चंद्रकांत पवार हे गंभीर जखमी झाले आहेत यांचेवर ग्रामीण रुग्णालयात लांजा येथे उपचार चालू आहेत.