Kokan: विद्युत वितरण कंपनीचा जीवघेणा कारभार !

0
89
विद्युत वितरण कंपनीचा जीवघेणा कारभार !
विद्युत वितरण कंपनीचा जीवघेणा कारभार !

शिरोडा- तिरोडा गावातील श्री देव आडारकर कुलदेवता मंदिर भरडवाडी येथील गेले दोन ते तीन वर्षे विद्युत खांबावर बसवलेला फ्युज बॉक्स उघड्या स्थितीत आहे. आता पावसात शेतीच्या कामांना वेग येणार असून तेथील शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना हा फ्युज बॉक्स धोकादायक ठरू शकतो. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्गात-पावसाचा-क/

एखाद्या गाई म्हशीने शिंग जरी मारलं तरी किती मोठा अपघात होऊ शकतो हे या विद्युत वितरण कंपनीला एखाद्याचा जीव गेल्यानंतरच लक्षात येईल काय तोपर्यंत कोणतेही लक्ष न देण्याचे विद्युत वितरण कंपनीने ठरवलेले दिसते. तरी काहीही अपरिहार्य दुर्घटना व धोका उदभवल्यास संपूर्ण विद्युत विभाग जबाबदार राहील.कारण आजपर्यंत वारंवार तक्रार करून सुद्धा उपकार्यकारी अभियंता अधिकारी शिरोडा, उपकार्यकारी अभियंता अधिकारी वेंगुर्ला व कार्यकारी अभियंता अधिकारी कुडाळ.सदर अधिका-यांकडे निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करत राहिलेत.तरी मंडळ कार्यालय सिंधुदुर्ग येथील सन्माननीय श्री.अधिक्षक अभियंता अधिकारी यांनी लवकरात लवकर लक्ष वेधावे,अशी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.दिनेश शांताराम मयेकर यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here