वेंगुर्ला प्रतिनिधी – नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेची १५३वी वार्षिक सर्वसाधारण सभा १९ मे रोजी संस्था उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात संपन्न झाली. कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आढावा घेताना, सन २०२५ पासून सिधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी क्षेत्रातील साहित्यिक वाचकाला पुरस्कार देण्याचा मानस तसेच जुनी इमारत दुरूस्ती, नविन इमारतीचे रंगकाम करणार असल्याचे सांगितले. स्पर्धा परिक्षा अभ्यासासाठी ई-लायब्ररी विभाग सुरू केला असून त्याला पुरेसा प्रतिसाद लाभत नसल्याची खंत श्री.सौदागर यांनी व्यक्त केली. मात्र, स्पर्धा परीक्षांसाठी संस्थेमधील आवश्यक पुस्तके मुले मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बाल वाचक चळवळ सुरू केली आहे. तर वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील शाळांना बालवाङ्मय पुरविण्यासाठी संस्थेने खरेदी केलेली पुस्तके वितरीत केली जाणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ड्रीम-११-कप-१४-वर्षाखा-5/
सध्या मुलांचा कल डिजिटल क्षेत्राकडे आहे. ‘ई बुक‘ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. चांगल्या वक्त्यांचे विचार ऐकण्याचे आता गरज आहे. यासाठी चांगल्या व्याख्यात्यांची व्याख्यानमाला आयोजित केली जाणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अॅड.देवदत्त परूळेकर यांनी सांगितले. स्वागत कार्यवाह कैवल्य पवार यांनी तर आभार कार्यकारी मंडळ सदस्य महेश बोवलेकर यांनी मानले.