Kokan: वेंगाबॉईजचा ९ दिवस ९ किलोमिटरचे वॉकींग उपक्रम

0
48
वेंगाबॉईजचा ९ दिवस ९ किलोमिटरचे वॉकींग उपक्रम
वेंगाबॉईजचा ९ दिवस ९ किलोमिटरचे वॉकींग उपक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी- शारिरीक व्याधीमुक्त जीवनासाठी रोजच्या रोज चालणे किवा धावणे ही प्रत्येकाची गरज आहे. यासाठी ‘वेंगाबॉईज‘ शहरात विविध कार्यक्रम राबवित आहेत. नवरात्रीच्या अनुषंगाने ९ दिवसांत प्रत्येक दिवशी ९ किलोमिटर चालण्याचे आवाहन ‘वेंगाबॉईज‘ने केले होते. रांगणा रनर्सच्या सिनियर सदस्यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे ७४ फिटनेस लव्हर्सने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.https://sindhudurgsamachar.in/kokan-तळेरे-ते-गगनबावडा-रस्त्य/

या कार्यक्रमाचा समारोप अल्टा रनर डॉ.शंतनु तेंडोलकर, डॉ.जयसिह रावराणे, मुंबईतील अल्ट्रा रनर संतोष पेडणेकर, पोलिस दाभोलकर, प्रदिप वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, डॉ.प्रल्हाद मणचेकर यांच्या उपस्थितीत झाला. ९ दिवस ९ किलोमिटर चालणा­-या फिटनेस लव्हर्सचा मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ.राजेश्वर उबाळे, निगा डायबेटीक फुल क्लिनिक-कणकवली, बॅ.नाथ पै फिजिओथेरपी कॉलेज-कुडाळ, डॉ.मकरंद काजरेकर यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवदत्त सावंत, डॉ.आर.एम.परब, डॉ.संजिव लिगवत, प्रिती कोळसुलकर, मोहन होडावडेकर, प्रा.अरविद बिराजदार, जयराम वायंगणकर, अनुप काणेकर यांनी सहकार्य केले.

फोटोओळी – सहभागी नर्सना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here