वेंगुर्ला प्रतिनिधी- अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांत जादूटोणा, भोंदूबाबा, भानामती या बाबतीत सविस्तर माहिती देऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बाबतीत जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सावंतवाडी जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष अरुण मेस्त्री यांनी वेंगुर्ला तालुका येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत केले. जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज‘ यावर विवेचन केले तर कार्यक्रमांचे अध्यक्ष तथा अंनिस जिल्हा उपाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत मार्गदर्शन केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-नगरपरिषदेतर्-2/
यावेळी सर्वानुमते शिवराम आरोलकर यांची वेंगुर्ला तालुका अध्यक्ष पदी, सीमंतिनी मयेकर यांची वेंगुर्ला तालुका सचिवपदी तर स्मिता गावडे यांची तालुका संफ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा समन्वयक विजय चौकेकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, जिल्हा महिला संघटक रूपाली पाटील, सहसचिव संजय खोटलेकर, जिल्हा सदस्य नामदेव मठकर, जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉ.सई लिंगवत, जिल्हा सदस्य सुनील गावडे आदी उपस्थित होते.
फोटोओळी – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक संपन्न झाली.