वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शाळा नं.३च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. यात इयत्ता तिसरीचा विद्यार्थी रेयांश संदिप कोळसुलकर याने ८८.६७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम व राज्यात ११ वा क्रमांक, इयत्ता पहिलीतील विद्यार्थी रघुवीर अमृत काणेकर याने ८८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात २रा व राज्यात ७वा क्रमांक पटकावला. तर आदर्श मनोज कासले याने ७२ टक्के गुणव मिळवून तालुक्यात ५ वा क्रमांक मिळविला.
रेयांश कोळसुलकर याने ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये ९७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर ३६ वा क्रमांकासहीत गोल्ड मेडल मिळविले. तर एसटीएस परिक्षेत त्याने गोल्ड मेडल मिळविले. इयत्ता दुसरीतील मिहिर गोविद मांजरेकर याने ब्राँझ मेडल मिळविले. जिल्हास्तरीय ‘ज्ञानी मी होणार‘ स्पर्धेत साईराज विनय सामंत व श्रीनिवास बाबुराव मयेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर श्रीनिवास मयेकर याची नवोदय विद्यालय सांगेली प्रवेशासाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती कुडाळकर, उपाध्यक्ष बाबुराव मयेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष अमृत काणेकर, माता पालक संघ उपाध्यक्ष वेदिका सामंत, मुख्याध्यापक शंकर सावंत, पालक शिक्षक संघ व माता पालक संघाने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो – रघुवीर काणेकर, मिहिर मांजरेकर, साईराज सामंत, आदर्श कासले, श्रीनिवास मयेकर, रेयांश कोळसुलकर