Kokan : वेंगुर्ला न.प.तर्फे भितीचित्र स्पर्धेचे आयोजन

0
40
वेंगुर्ला न.प.तर्फे भितीचित्र स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ला न.प.तर्फे भितीचित्र स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १३ ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये वेंगुर्ला भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रहित-व-देशनिष्ठेल/

या स्पर्धेसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने निश्चित केलेल्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आर्ट डिप्लोमाधारक, एटीडी प्रमाणपत्रधारक अथवा प्रवेश घेतलेला विद्यार्थी, कला  शाखेचे प्रमाणपत्रधारक अथवा प्रवेश घेतलेले विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभाग घेवू शकतात. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.

या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी व कलाकारांनी सहभाग होऊन आपल्या कला प्रदर्शित करावी असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किवा अधिक माहितीसाठी शहर समन्वयक पूर्वा मसुरकर (९४२१०७४८००) यावर संफ साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here