वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला बंदरावरील झुलत्या पूलावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच शहरातील आंतर्रिक रस्त्यांची सुधारणा करण्याबाबत अॅड.मनिष सातार्डेकर यांनी मुख्याधिका-यांना निवेदन दिले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-लोक-अदालतीमधून-३-लाखांची/
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झुलतापूलामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनात भर पडत आहे. परंतु, या पुलावर विद्युत रोषणाई नसल्याने रात्रीच्यावेळी हा झुलता पुल काळोखात असल्याने या पुलाचे सौंदर्य रात्रीच्यावेळी पर्यटकांना पाहता येत नाही. त्यामुळे या पुलावर लवकरात लवकर विद्युत रोषणाई करावी. तसेच शहरातील आंतर्रिक रस्त्यांची दुरावस्था झालेली असून हे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्याची डागडुजी करावी असे नमुद केले आहे.
फोटोओळी – अॅड.मनिष सातार्डेकर यांनी दिलेले निवेदन प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांनी स्वीकारले.