वेंगुर्ला प्रतिनिधी- मठ येथील स्वयंभू मंदिरात ६ ते ९ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पैठणचे-संत-ज्ञानेश्वर-उ/
दि. ६ रोजी सकाळी देवास नारळ ठेऊन उत्सवास प्रारंभ, लघुरुद्र, अभिषेक, सायं. ७ वा. दीपोत्सव व रात्रौ ८ वा. ह.भ.प.भाऊ नाईक यांचे किर्तन, दि.७ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सायं. ७ वा. दीपोत्सव व रात्रौ ८ वा. ह.भ.प.भाऊ नाईक यांचे किर्तन, दि.८ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सायं. ७ वा. दीपोत्सव व रात्रौ ८ वा. ह.भ.प.भाऊ नाईक यांचे किर्तन, पालखी प्रदक्षिणा व रात्रौ ११.३० वा. दशावतारी नाट्यप्रयोग, दि.९ रोजी सकाळी ९ वा. उत्सवाची सांगता, दुपारी १२ वा. महाप्रसाद होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.