वेंगुर्ला प्रतिनिधी – गौड सारस्वत समाज वेंगुर्ला उपसमितीने वेंगुर्ला येथे खास विवाहित महिलांसाठी आयोजित केलेल्या “युनिक कपल स्पर्धा 2023′ या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत विविधांगी कला प्रकार सादर करीत राहूल व सान्वी आडारकर यांनी रोख रु. 15 हजार, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रासह प्रथम पारितोषिक पटकाविले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुल्र्यात-20-मे-रोजी-मह/
भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयामध्ये घेतलेल्या या स्पर्धेत नऊ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन गौड सारस्वत समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, वेंगुर्ला अध्यक्ष सुजाता पडवळ, सचिव अमृता पाडगांवकर, खजिनदार सुधीर झांटये, परिक्षक केदार सामंत, अमित देसाई, नंदिनी देसाई, समितीचे पदाधिकारी दिगंबर नाईक, अमोल आरोस्कर, तृप्ती आरोस्कर, राखी दाभोलकर, अमोल प्रभूझांट¬े, अमोल खानोलकर, अॅड. सुषमा खानोलकर, स्मिता नाबर, सिमा नाईक, स्वाती पोतनिस, संजय पूनाळेकर, डॉ. प्रसाद प्रभूसाळगांवकर उपस्थित होते.
स्पर्धेत द्वितीय पारितोषिक रु. 11 हजार हे संजय व मानसी कांबळे यांनी जिंकले. तर तृतीय पारितोषिक रु. 8 हजार अतुल व अस्मिता वाडोकर यांनी पटकाविले. तसेच बेस्ट कोऑर्डनिशनचे पारितोषिक हे पुन्हा राहूल व सान्वी आडारकर यांनी, बेस्ट कॅटवॉकचे पारितोषिक संजय व मानसी कांबळे यांनी तर बेस्ट आऊट फिटचे पारितोषिक विकेश व प्रिन्सी रायकर यांनी जिंकले. मुख्य कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी आपल्या बहारदार शैलित करुन सर्वांची वाहवा मिळविली. कु. शर्वरी नाबर यांनी कोरियोग्राफी केली. मध्यंतरामध्ये घेतलेल्या फनीगेम्सने मजा आणली. खास मालवणी स्टॉल वरील चमचमित मसालेदार पदार्थ आकर्षण ठरले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास जनार्दन शेटये, सचिन वालवलकर यांची मोलाची मदत झाली.
फोटोओळी – युनिक कपल स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.



[…] कुडाळ – कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून २५/१५ ग्राम विकास निधी अंतर्गत रामगड येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर ते देसाईवाडा जाणाऱा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ ग्रामस्थ सखाराम घाडीगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.रामगड गावात आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे मंजूर झाली असून येत्या काळात त्या कामांना ही सुरुवात केली जाणार आहे.उर्वरित प्रलंबित कामे देखील मंजूर करण्याचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी यावेळी दिले.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-युनिक-कपल-स्प/ […]