वेंगुर्ला प्रतिनिधी– आकाश फिश मिल कंपनीने रसायनुक्त पाणी समुद्रात सोडल्यास सागरी जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर केळुस येथे मच्छिमार व पंचक्रोशितील शेतक-यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंपनीच्या पाईपलाईनला विरोध करुन प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केल्याचा श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रवादीच्या-वर्धाप/
पाईपलाईनसाठी फिश कंपनीने केळुस ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखल्याची मागणी केल आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत उपस्थितांनी यापूर्वी कंपनीतील पाण्यामुळे बागायतीला झालेले नुकसान व अन्य त्रासाबद्दल माहिती दिली. तसेच आकाश फिश मिलकडून होणा-या जल, वायू, ध्वनी प्रदूषणाबद्दल नाराजी व्यक्त केली. या बैठकीमध्ये आकाश फिश मिलच्या प्रस्तावित असलेल्या पाईपलाईनमधून समुद्रामध्य प्रक्रियायुक्त पाणी सोडण्यास विरोध करण्याचे ठरविले. त्यासाठी शेतकरी व मच्छिमार यांची एकत्रित समन्वय समिती स्थापन करुन लढा देण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला श्रमिक मच्छिमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, उपाध्यक्ष बाबी जोगी, नॅशनल फिश फोरमचे सदस्य रविकिरण तोरसकर, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष मिथून मालंडकर, मच्छिमार नेते बाळू वस्त, राजेश गिरप, कासवमित्र सुहास तोरसकर, केळुस सरपंच योगेश शेटये, आंदुर्ले ग्रामपंचायत सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या मच्छिमार उपस्थित होते.
फोटोओळी – बैठकीवेळी बाबी जोगी यांनी मार्गदर्शन केले.