Kokan: वेंगुर्ला येथील समर कॅम्पचा समारोप

0
35
समर कॅम्प,
वेंगुर्ला येथील समर कॅम्पचा समारोप

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सुरु असलेल्या समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या समर कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-मांडवीखाडी-मद/

      व्ही.जी.फिटनेसतर्फे कॅम्प मैदानावर १३ ते १९ मे या कालावधीत सकाळी ८ ते ९ या वेळेत मोफत समर कॅम्प आयोजित केले होते. याचे उद्घाटन शंकर मांजरेकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात व्यायाम व खेळाबरोबरच विविध उपक्रमही घेण्यात आले. मुलांसोबत पालकांनीही स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनाही मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. समारोपप्रसंगी अॅड. मनिष सातार्डेकर यांनी फिटनेस महत्त्व सांगून व्हि.जी.फिटनेसचे अध्यक्ष वासुदेव गावडे यांचे कौतुक केले.

      हे समर कॅम्प यशस्वी होण्यासाठी बॉथम ऑल्मेडामृणाल परबसमिर प्रभूखानोलकरशामल मांजरेकरकविता चौधरी यांच्यासह व्हि.जी.फिटनेसचे सदस्य विकास सावळसिताराम कावळेप्रतिराज कुडपकरदिनेश कुडपकरस्वाती गावडे तसेच सहभागी सर्व मुलांच्या पालकांचे सहकार्य लाभले.

फोटोओळी – समर कॅम्प प्रसंगी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या मुलांना व पालकांना मेडल व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here