Kokan: वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

0
89
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत "मोफत " "आरोग्य तपासणी शिबीर"

वेंगुर्ला प्रतिनिधी- पामोसा फाऊंडेशन, पुणे व श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत सातेरी मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भारतीय-डाळिंब-समुद्रमा/

या शिबिरात पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.संतोष पाठक हे हृदयविकार, थायरॉईड, मधुमेह, लिव्हर आजार, संधीवात, आमवात, मणक्याचे आजार, बालरोग, त्वचेचे विकार,  मुळव्याध,  मूतखडा,  स्त्रियांचे आजार, केसगळती याबाबत तपासणी करून आहार व आयुर्वेदिक औषध सल्ला तसेच सौंदर्य विषयक सल्ला देणार आहेत. सवलतीच्या दरात औषधेही मिळणार आहेत. इच्छुक रूग्णांनी आपली नावनोंदणी सातेरी मंदिर (९४०४१७९४२९), संजय परब (९४२२४३५७३१) किवा संजय परब (९९२०६५२७०९) यांच्याकडे करावी. जास्तीत जास्त रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here