Kokan: वेंगुर्ला शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष

0
37
वेंगुर्ला शहर समस्या,
वेंगुर्ला शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष


वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला शहरातील नागरिकांना भेडसावणा-या वाहतूक कोंडी व स्वच्छतेची समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देत लक्ष वेधले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-महिला-राष्ट्/

वेंगुर्ला बाजारपेठेत नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी, शहरातील भटक्या मोकाट जनावरांचा त्रास व्यापारी, वाहने, पादचारी यांना होत आहे. त्यांचाही विशिष्ट उपायोजना करून बंदोबस्त करावा, पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस असल्याने विहीरीचे पाणी गढूळ झाले आहे, मानवी आरोग्य लक्षात घेऊन नगरपालिकेमार्फत संबंधीत औषधे विहीरीमध्ये टाकावीत, विद्युत पुरवठा सुरळीत रहाण्यासाठी विद्युत तारांवरील धोकादायक झाडे तोडावीत, शहरातील सार्वजनिक शौचालयांचया ठिकाणी कमोड शौचालयाची व्यवस्था करावी. या सर्व समस्यांचे निराकरण होण्याकरीता व ही विकास कामे पूर्णत्वास नेण्याकरीता लागणारा निधी आम्ही दिपक केसरकर यांच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करुन देऊ. आपण आम्ही केलेल्या सूचना तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांचे समवेत युवक शहर संतोष परब, महिला आघाडी प्रमुख अॅड.श्रद्धा बाविस्कर, महिला आघाडी उपशहर प्रमुख मनाली परब, प्राची परब, राजू परब, संजय परब, देविदास वालावलकर, बाळा परब, जयेश गावडे, संदिप गावडे, मनिष रेवणकर, अतुल केरकर, सुरेश कांबळी, सदानंद पांजरी, स्वप्नील पांडजी, विजय गावडे आदी उपस्थित होते.
फोटोओळी – शिवसेनेच्या पदाधिका-यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here