वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये बुधवारी भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. https://sindhudurgsamachar.in/maharashtraमहिंद्रातर्फे-बोलेरो-न/
ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात रामसीतेची आकर्षक पूजा बांधण्यात आली. ११ वाजता ह.भ.प.अरुणबुवा सावंत यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर रामजन्म होऊन श्रीरामाची पालखीतून भजनासहीत प्रदक्षिणा काढण्यात आली. दुपारी १ वाजता आरती होऊन उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला.
मारुती स्टॉप येथील हनुमान मंदिरात ह.भ.प.अवधुत बुवा नाईक यांचे राजन्माचे कीर्तन होऊन रामजन्म करण्यात आला. सायंकाळी भजन आणि आरतीने उत्सवाची सांगता झाली. तर शहरातील भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात, कुबलवाडा येथील राम व मारुती मंदिरात, रहाटाच्या विहिरीकडील मारुती मंदिरात रामजन्म करण्यात आला.
फोटोओळी – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात आकर्षक राम सीतेची पूजा बांधण्यात आली.