वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधि-यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या असून सर्व पदाधिका-यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा अॅड.रेवती राणे व वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते पद नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-अथर्व-पालव-व-पवन-कांबळे/
येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमांत जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सुप्रिया परब, शहर उपाध्यक्ष संदेश रगजी, युवक शहर अध्यक्षपदी नितीन तेली, महिला शहर अध्यक्षपदी दीपाली गावडे, वेंगुर्ला शहर कार्यकारिणी सदस्यपदी शैलेश भोसले आदींना महिला जिल्हाध्यक्ष अॅड.रेवती राणे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल व जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी-नूतन पदाधिका-यांना अॅड.रेवती राणे यांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली.