Kokan: वेंगुर्ला हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्या ‘दिपावली शो टाईम’ चे उद्घाटन

0
24

मंडळाने माजाभिमुख उपक्रम राबवावेत-प्रसन्ना देसाई

वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ला येथील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळातर्फे २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत दिपावली शो टाईमचे आयोजन केले. याचे उद्घाटन सोमवारी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगरसेवक विधाता सावंत व ज्येष्ठ व्यापारी अशोक ठोंबरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मंडळाने रक्तदान व आरोग्यासारखे समाजाभिमुख उपक्रम राबवावेत. या मंडळाला तालुक्यातील एक आदर्श मंडळ म्हणून नावलौकिक मिळावा असे कार्य मंडळाच्या हातून घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवस, उपाध्यक्ष अॅड.मनिष सातार्डेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तानावडे, प्रशांत नेरुरकर, सुरेंद्र चव्हाण, शाम कौलगेकर, प्रणव वायंगणकर, भुषण सारंग, मनिष परब यांच्यासह राहूल वेंगुर्लेकर, आनंद कळेकर, महेंद्र गावडे, रामचंद्र सावंत, जयंत सावंत, मनिष कळेकर, प्रफुल्ल सावंत, सिद्धेश मांजरेकर, रुपेश सावंत, सचिन मांजरेकर, सौरभ भोसले, ऋतिक गवस, कौस्तुभ मयेकर, परमानंद नार्वेकर, अॅड.प्रकाश बोवलेकर, प्रशांत गावडे, करण निरावडेकर, आसिफ खान, निखिल शिरोडकर, तेजस कुडाळकर, खुशाल निरावडेकर, मुकूल सातार्डेकर, शशांक मडकईकर, मकरंद होळकर, सुभाष सोनुर्लेकर, तेजस धुरी, अद्वैत बोवलेकर, कौस्तुभ गवस, जितेंद्र धुमक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोवेकर यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रमानंतर दांडिया आणि फुगड्या सादर करण्यात आल्या. दि.२५ रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, २६ रोजी सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘किमीच्छक्र व्रत‘ हा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग, २७ रोजी सायंकाळी ७ वाजता खास महिलांसाठी होममिनिस्टर असे कार्यक्रम करण्यात आले.

 

फोटोओळी – हॉस्पिटल नाका येथील दिपावली शो टाईमचे उद्घाटन बाळू देसाई यांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here