Kokan: वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या चार खलाशांपैकी एक मृतदेह सापडला ; बुडालेली नौकाही काढली बाहेर

0
47

कोस्ट गार्ड कडून हेलिकॉप्टर द्वारेही शोध सुरू; तीन मृत देहाचा शोध सुरू

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले बंदर येथे रात्री चक्रीवादळ स्थिती मुळे छोटी मासेमारी  होडी बुडाली  आज सकाळी मूठ समुद्रात सकाळी आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर वयः ६६  यांचा मृतदेह ही मोचेमाड समुद्रात मिळाला आहे. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-दहावी-परिक्षेचा-निकाल-27-म/

 कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू

वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांच्या शोध साठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू आहे. बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी तसेच तहसीलदार ओकार ओतारी, फिशीरीज चे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.

 तीन खलाशी पोहून आल्याने वाचले

समुद्र किनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता वयः ४९,  राजा कोल वयः २९ व सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत. ते किनाऱ्यावर आले असून दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत.

 चार खलाशी बेपत्ता : एक मृतदेह सापडला

बेपत्ता असलेल्या मध्यप्रदेश येतील चार खलाशांपैकी तीन खलाशी अद्याप बेपत्ता त्यात आझान मुनीलाला कोल वयः १६, चांद गुलाम महम्म्द, व शिवराम कोल यांचा समावेश आहे. तर यातील चौथा रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर वयः ६६  यांचा मृतदेह मोचेमाड येथे सापडला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तून  मृतांना मदत करावी मच्छीमार याची मागणी

बोट दुर्घटनेतील मृताच्या नातेवाईक यांना मुख्यमंत्री  सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी  जेणे करून या कुटूबाला आधार मिळू शकेल. अशी मागणी होडी मालक चालक सघतनेकदून. करण्यात आली

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मदतीचे दिले आश्वासन

होडी दुर्घटनेने बंदर परिसरात शोककळा पसरली होती या घटनेत एक मृत हा रत्नागिरी येथील तर तिघे मध्यप्रेश येथील आहेत होडी मालक बाबी रेडकर यांनी सदर घटनेची माहिती दीपक केसरकर यांनी दिली त्यांनी तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले 

चार ही मृत नातेवाईक याचा आक्रोश

रत्नागिरी व मध्यप्रदेश येथील मृताचे नातेवाईक याना दुर्देवी घटना कळताच वेंगुर्ला बंदर येथे प्रथम धाव घेतली त्यानंतर वेंगुर्ला उप जिल्हा रुग्णालय व तदंनतर पोलीस स्थानकात गेले मृताच्या नातेवाईक यांनी एकच हबरडा फोडला व वातावरण शोकाकुल बनले. दोन्ही मृतदेहाचे शोधकार्य जोरदार सुरू असून बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात बग्याची गर्दी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here