वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ले बंदरात खलाश्याना घेऊन जाणारी बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. काल दोन तर आज दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेले चार पैकी तीन मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी होते.आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा रत्नागिरी मधील खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्ह्णून कामाला होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ले-बंदरात-बुडाले/
वेंगुर्ला बंदर येथे लहान होडी समुद्रात बुडून या होडीतील मध्यप्रदेशातील २ खलाशी बेपत्ता तर होडीवरील तांडेल रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (६६) यांचा सकाळी १० वाजता मृतदेह मोचेमाड समुद्रात तर खलाशी शिवराम कोल (२२) याचा मृतदेह वेंगुर्ला सागरेश्वर किनारी आढळून आला आहे. दरम्यान या होडीतून एकूण ७ खलाशी मोठ्या मासेमारी करणाऱ्या होडीत जात असताना ही दुर्घटना घडली. यातील ३ खलाश्यानी आपला प्राण वाचवला आहे.
गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येथील मासे व्यावसायिक बाबी रेडकर यांच्या मासेमारीच्या लॉन्चवर हे खलाशी जाण्यासाठी निघाले होते. मात्र अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व उधाणाने होडी आपला मार्ग बदलून भरकटली. यावेळी होडी बंदर वरीलच एका दगडाला आदळून होडीवरील सर्व खलाशी समुद्रात फेकले गेले व होडी समुद्रात बुडाली. वाऱ्याचा वेग एवढा होता की सर्व खलाशी वेगवेगळ्या दिशेला वाहून गेले. यातील ३ खलाशी आपला जीव वाचवून वेंगुर्ला बंदरात पोहोचगले.
दरम्यान ही बुडालेली होडी आज सकाळी १० वाजता उभादांडा मूठ समुद्रात आढळून आली. ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर ( ६६) यांचा मृतदेह मोचेमाड समुद्रात मिळाला. तर खलाशी शिवराम कोल (२२) याचा मृतदेह सागरेश्वर समुद्रकिनारी आढळून आला. पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत
यावेळी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे सायंकाळी उशीरापर्यंत शोधकार्य करण्यात आले. यावेळी सायंकाळी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच बंदरावर सकाळपासून तहसीलदार ओंकार ओतारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, फिशीरीज चे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासहित पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पांडुरंग खडपकर, बंटी सावंत, संदेश कुबल, रमेश तावडे यांच्यासह अन्य पोलीस, सत्स्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
दरम्यान यावेळी समुद्र किनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता (४९), राजा कोल (२९) व सचिन कोल (३०) हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत तर बेपत्ता असलेल्या मध्यप्रदेश येतील २ खलाशांमध्ये आझान मुनीलाला कोल वय (१६), चांद गुलाम महम्मद (१९) यांचा समावेश आहे.
दरम्यान यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, बाळू प्रभू, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, मनोहर तांडेल, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, उबाठा युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट आदीनी घटनास्थळी भेट दिली.
ही घटना घडण्याच्या ठीक १५ ते २० मिनिटापूर्वी वेंगुर्ले बंदर येथे मासे साफ करणाऱ्या एका महिलेचा तोल जाऊन ती समुद्रात पडली. यावेळी बेपत्ता असलेल्या खलाश्यापैकी काहींनी त्या महिलेला वाचवले व नंतर आपली होडी समुद्रात घेऊन जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अगोदर १५ मी हे मोठ्या लॉन्चच्या दिशेने जाण्यासाठी निघाले असते तर हा अनर्थ टळला असता अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.
चौकट: मागील सुमारे ४ वर्षे यातील काही खलाशी याठिकाणी काम करत आहेत. मासेमारी हंगाम १ जून पासून बंद होत असल्याने पुढील दोन दिवसात समुद्रातील लॉन्च समुद्रातून बाहेर काढण्यात येणार होत्या व हे खलाशी आपल्या गावी जाणार होते. मात्र अचानक यांच्यावर काळाने घाला घातला.
वेंगुर्ले बंदरात खलाश्याना घेऊन जाणारी बोट पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. काल दोन तर आज दोन मृतदेह सापडले आहेत. बोट बुडून मृत झालेले चार पैकी तीन मध्यप्रदेश तर एक जण रत्नागिरी मधील खलाशी होते.आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेश मधील तर महादेव शंकर आंबेरकर हा रत्नागिरी मधील खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्ह्णून कामाला होते.