Kokan: वेंगुर्ल्यात २१ रोजी काव्यवाचन स्पर्धा

0
20
वेंगुर्ल्यात जिल्हास्तरीय लघुकथा लेखन स्पर्धा
वेंगुर्ल्यात जिल्हास्तरीय लघुकथा लेखन स्पर्धा

वेंगुर्ला प्रतिनिधी- नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे २१ एप्रिल रोजी सकाळी १० वा. श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात जिल्हास्तरीय सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-या-जन्मावर-प्रेम-करावे/

      संस्थेने स्थानिक वृत्तपत्रांमधून या काव्य वाचन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील कवींना स्वरचित कविता पाठविण्याच्या केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक कवींना २१ एप्रिल रोजी निमंत्रित करण्यात आले आहे. निवडण्यात आलेल्या वेंगुर्ला शहराच्या बाहेरून येणा-या कवींना प्रत्येक २०० रूपये एवढा प्रवास खर्च देण्यात येणार आहे.

      निमंत्रिक कवींच्या सादरीकरणाला गुण असल्याने प्रभावी सादरीकरणातून प्रथम तीन क्रमांक निवडले जाणार असून त्यांना अनुक्रमे ३००१२००११००१ अशी रोख पारितोषिक दिली जाणार आहेत. तरी निमंत्रित कवींनी आपली कविता सादर करण्यासाठी स्वतः उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कैवल्य पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here