Kokan: व्याखानमालाचे ५० वे व्याखान; प्रभूगांवकर पूर्ण प्राथ. केंद्रशाळा मसुरे नं . १ येथे संपन्न

0
53
व्याखानमाला,
व्याखानमालाचे ५० वे व्याखान; प्रभूगांवकर पूर्ण प्राथ. केंद्रशाळा मसुरे नं . १ येथे संपन्न

⭐५० व्या व्याख्याना निमित्त विजय चौकेकर यांचा सत्कार – –

मसुरे/ वार्ताहर- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी आपल्या कार्यकाळात अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा आणि प्रात्यक्षिका द्वारे जादूटोणा विरोधी कायदा लोकांना समजून सांगण्यास सुरुवात केली . आणि त्यांचे या व्याख्यान मालेचे पन्नासवे पुष्प दाजीसाहेब प्रभूगावकर पूर्ण प्राथ केंद्रशाळा मसुरे नं . १ या प्रशालेत येथे संपन्न झाले .https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवण-शहरात-नगरपरिषद-प्र/

यावेळी प्रशालेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका श्रीम. शर्वरी सावंत आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. शितल मसूरकर यांच्या शुभ हस्ते विजय चौकेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी केंद्रप्रमुख श्री देशमुख सर, प्रशालेचे शिक्षक विनोद सातार्डेकर , गोपाळ गावडे , रामेश्वरी मगर मॅडम , सोनाली राऊत, शीफा शेख, हेमलता दुखंडे, बापू मसुरकर,संतोष दुखंडे,ज्योती पेडणेकर ग्रामस्थ, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि समिती सदस्य आदी उपस्थित होते . विजय चौकेकर यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पहिल्यांदा जिल्हा सरचिटणीस पदावर काम सुरू केले . आणि रविंद्र खानविलकर राज्य उपाध्यक्ष , जनार्दन साबळे , सचिन हिंदळेकर जिल्हा संपर्क प्रमुख , अनिल चव्हाण कार्याध्यक्ष यांना सोबत घेऊन महाराष्ट्र शासनाने संमत केलेला जादूटोणा विरोधी कायदा गाव , शाळा , विद्यालये , महाविद्यालये येथे व्याख्यानाच्या माध्यमातून आणि प्रात्यक्षिकाच्या सहाय्याने पोहोचविण्यास सुरुवात केली .

त्यांनंतर त्यांची जिल्हा संघटक म्हणून राज्य उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर व महाराष्ट्र संघटक हरीभाऊ पाथोडे यांनी प्रा . श्याम मानव यांच्या परवानगीने नियुक्ती केली . जादूटोणा विरोधी कायदा तळगाळापर्यत पोहोचावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १४ जून २२ रोजी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग ची स्थापना झाली . अभाअंनि समितीने मा . जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन शासनाचा कायदा तळागाळापर्यत पोहचविण्यासाठी संयुक्त कामकाज करण्याची परवानगी घेतली आणि तेथूनच त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गावा – गावा मध्ये ‘शाळा -शाळां मध्ये , महाविद्यालयांमध्ये पुन्हा अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा प्रात्यक्षिकांसह लोकांना समजाऊन देण्यासाठी व्याखानमाला सुरु केली . आणि त्यांचे ५० वे व्याखान . दाजीसाहेब प्रभूगांवकर पूर्ण प्राथ. केंद्रशाळा मसुरे नं . १ येथे संपन्न झाले . त्या निमित्ताने त्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला . मुलांना त्यांनी सोप्या भाषेत आणि हातचलाखीचे आणि रासायनिक द्रव्याचे प्रयोग करून दाखवून भोंदू बाबा लोकांना कसे फसवितात हें समजावून दिले आणि जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले .

छाया दत्तप्रसाद पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here