आंदुर्ले- व्हिजन ग्रुप आंदुर्ले व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंदुर्ले ग्रामपंचायत सभागृह येथे १०वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या गावातील महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये यश संपादन केलेल्या कु. दिपक बाबुराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच कु.श्रुतिका श्रीकृष्ण मोर्ये हीने संगीत कला क्षेत्रातील परीक्षा उत्तीर्ण करून महिला पखवाज विशारद ही पदवी संपादन केली हीचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-देवगड-पोलीस-ठाणेच्या-वती/
यावेळी कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती श्री.संजयजी वेंगुर्लेकर साहेब, उपसरपंच श्री.चंद्रकीसन मोर्ये माजी सरपंच व विद्यमान सदस्य सौ.आरती पाटील, सोसायटी वाइस चेअरमन श्री.दिगंबर मयेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.सदानंद सर्वेकर, सोसायटी माजी चेअरमन श्री.महेश राऊळ ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल भगत, श्री.प्रसाद सर्वेकर, श्री.सतिश राऊळ,श्रीम.अंजनी पाटकर, सौ.सुप्रिया येरम या सर्वांनीच विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले…तसेच कु. दिपक चव्हाण याने सुद्धा आपण कसे यश संपादन केले याबद्दल मोजक्या शब्दात पण बहुमूल्य असे मनोमन व्यक्त केले….मी सरपंच या नात्याने कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शक केले व या सोहळ्याला सर्वच वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाचा समारोप केला.