⭐ ८ जणांवर गुन्हा दाखल; ४६ मशीनसह ९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त
कुडाळ-: व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या तब्बल ५ व्हिडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्या मालकांना आज ताब्यात घेण्यात आले आहे. यात कारवाईत ४३ हजाराच्या रोख रक्कमेसह ४६ मशीन मिळून तब्बल ९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री साडे सात ते रात्री अकरा वाजे पर्यंत करण्यात आली. मध्यरात्री या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण जयराम माळवे (वय ३८, रा. कुडाळकर चाळ, केळबाई मंदिर जवळ ता कुडाळ), महादेश रतन निषाद (वय ३३, रा. रेल्वेस्टेशन रोड कुडाळ), भिमराव ऐबत्ती परगणी (वय ४४, रा. आंबेडकर नगर कुडाळ), संजय महादेव वाडकर (वय ५२, रा. सबनिसवाडा-सावंतवाडी), रफिक कादरसाब अगडी (वय ४६, रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा), वैभव यशवंत सरमळकर (वय २७, रा. कदमवाडी कुडाळ), शैलेशकुमार धरमसेन गुप्ता (वय ३९, रा. सालईवाडा- सावंतवाडी) अक्षय अनिल धारगळकर (वय २९, रा. कुडाळ मधली कुंभारवाडी, ता. कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवशाही-गाडी-आणि-रिक्षा-म/
या कारवाईत ओमसाईराम व्हिडीओ गेम, साई दर्शन व्हिडीओ गेम, कुडाळेश्वर व्हिडीओ गेम, मुजीब व्हिडीओ गेम आणि म्युझिक व्हिडीओ गेम यांच्यावर करण्यात आली. दरम्यान यातील सर्व संशतियांनी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तर गुन्हा दाखल करण्यात आलेले कामगार आणि खेळणारे आहेत. त्या व्हिडीओ गेम मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे तपासिक अमंलदार गणेश कऱ्हाडकर यांनी सांगितले. ही कारवाई कहऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक भिमसेन गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षक रविंद्र भांड, हवालदार गणेश चव्हाण, कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबतची माहिती कुडाळ तसेच जिल्ह्यातील विविध संघटनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्या ठिकाणी व्हिडीओ गेमच्या नावावर जुगार खेळला आहे. त्यातून आर्थिक व्यवहार होत आहे, अशी तक्रार होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असे कहऱ्हाडकर यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या प्रयत्नांना यश
⭐सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,यांचे वेधले होते लक्ष
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. व जिल्ह्यात होत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होत असलेल्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधले. हे व्हिडिओ गेम पार्लर विरंगुळा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय उपचिटणीस शाखा यांच्याकडून अटी शर्तीच्या आधारावर दिली जाते.परंतु या दिलेल्या अटी शर्तीचे पालन न करता.मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे. याचा तरुणाईला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.परंतु त्याचा भ्रम निरास होऊन ते आत्महत्ये सारखे पाऊल उचलतात. तरी यावर प्रतिबंध घालावेत अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याजवळ निवेदने दिली होती.
त्यानुसार काल रात्री तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्यांच्या मालकांना आज ताब्यात घेण्यात आले या कारवाईत ९ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई तपासिक अंमलदार श्री.गणेश कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. भिमसेन गायकवाड,प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक श्री.रविंद्र भांड,पोलीस हवालदार श्री.गणेश चव्हाण,श्री. कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक,पोलीस प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.