Kokan: व्हि.एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले

0
7
बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले
बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले

सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित पालकांसाठी पाककला स्पर्धा

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार – सुनिता भाईप/ सावंतवाडी-
येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.दर्शना कावले (मुग कटलेट) द्वितीय क्रमांक सौ.रेश्मा सावंत (मुगागाठी) तृतीय क्रमांक रंजना धुरी (मुगाचे कढण)यांना देण्यात आला. एकूण १४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. तसेच विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत मध्ये सुद्धा भाग घेतला होता. https://sindhudurgsamachar.in/kokan-तलाठी-कार्यालयातून-शेतक/

विविध फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या.सदर स्पर्धेसाठी सौ.मंगल मयेकर,कु.जान्हवी नाईक,कु.भाग्येश धुरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.तसेच परिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषक आहाराबद्दल माहीती देण्यात आली. यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु.वेदीका देसाई हीने सरस्वती देवी ची पुजा केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली भजने सादर केली.विद्यार्थी पालक यांना तीर्थप्रसाद देण्यात आला. दुसऱ्या दिवशी उत्तर पुजा व आरती संस्थेचे पदाधिकारी श्री. योगेश्वर पाडलोकर,श्री.त्रिविक्रम उपाध्ये,श्री.बी.सतरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. विद्यार्थ्यांनी ढोल ताश्याच्या गजरात सरस्वती देवीचे विसर्जन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here