Kokan: शनिवारी रात्रीची घटना; कुडासेत भिंत कोसळून महिला जखमी ; दोन मुलांसह सून बचावली

0
128
अवकाळी पाऊस
गोवासह समस्त कोकणात कदाचीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

दोडामार्ग ता.२३-: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे कुडासे वानोशी येथे शनिवारी (ता.22) रात्री आठच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय 65) या जेष्ठ महिला जखमी झाल्या.यावेळी त्यांच्यासह त्यांची सून व दोन लहान नातवंडे घरात होती. मात्र प्रसंगावधान राखून त्यांची सून मुलांना घेऊन बाहेरच्या दिशेने पळाल्याने तिघेही सुखरूप राहिली.

भगवान वरक यांचे कुडासे वानोशी येथे राहते घर आहे .ते याठिकाणी आपली वयोवृद्ध आई , बायको व दोन लहान मुलांसह राहतात .ते शनिवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरात त्यांची आई, बायको व लहान मुले होती.तालुक्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होता.साधारण ८ च्या दरम्यान ठकी वरक आंघोळीसाठी घराच्या मागे गेल्या होत्या,तर त्यांची सून व नातवंडे पुढच्या बाजूला भिंतीपलीकडे होती.तेवढ्यातच घराची मधली भिंत अचानक कोसळली. प्रसंगावधान राखून त्यांची सून आपल्या दोन मुलांना घेऊन बाहेरच्या दिशेने पळाल्या, त्यामुळे त्यांना मुलांना कोणतीही इजा झाली नाही; मात्र ठकी वरक जखमी झाल्या. त्यांच्या कंबरेला , पाठीला व पायाला मार लागला. अतिवृष्टी मुले घराची भिंत कोसळून वरक कुटुंबियांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-गोवा-महामार्गावर-स/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here