भडगाव बुद्रुक सह्याद्री माध्यमिक विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा उत्साहात संपन्न;भडगाव विद्यालयाच्या सभामंडपासाठी आ. वैभव नाईक यांनी जाहीर केला १० लाखाचा निधी
प्रतिनिधी- पांडुशेट साठम
पूर्वी भडगाव गाव विकासापासून वंचित होता. अशा गावात ५० वर्षापूर्वी शिक्षणाचे बीज रुजवून त्याचे रूपांतर वटवृक्षात करणे हि साधी गोष्ट नाही. मात्र त्यावेळेच्या ध्येयवेड्या लोकांनी हे स्वप्न साकार केले. महाराष्ट्रात मी अनेक शिक्षण संस्था पहिल्या आहेत.मात्र कोकणातील शिक्षण संस्थांचा मला अभिमान आहे. शिक्षणाचे पावित्र्य राखण्याचे काम या संस्थांनी केले आहे. शिक्षण किती घेतलात त्यापेक्षा शिक्षण काय घेतलात हे महत्वाचे आहे. मी देखील मुंबईच्या रात्रीच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांनीही शिक्षणात अधिकाधिक प्रगती करणे आवश्यक आहे.त्यासाठी शिक्षण संस्था तुमच्या पाठीशी आहेत. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-भारत-स्काऊट-गाईड-अंतर्गत/
कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सांगता सोहाळा बुधवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, सध्या नागरिकांचा ओघ शहरीकरणाकडे वाढत आहे. मात्र भडगाव माध्यमिक विद्यालयात चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. शाळेबद्दल येथील नागरिकांना प्रेम आहे. तसेच सातत्याने १० वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागत आहे हे कौतुकास्पद आहे.कुडाळ शहरातील शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोयी सुविधा असणे गरजेचे आहे. त्यामुळे भडगाव विद्यालयात सभामंडपासाठी १० लाख रु निधी देत असल्याचे आ. वैभव नाईक यांनी जाहीर करत इतर आवश्यक सोयीसुविधांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, संस्था अध्यक्ष शेखर सावंत, कडावल सरपंच शीतल कल्याणकर, विभाग संघटक संदीप सावंत, राजू गवंडे,संदीप म्हाडेश्वर, लालू सावंत, विद्याधर मुंज, डॉ सुनील सावंत, अरुण माळकर, निवास नाईक, अनुराग सावंत, माजी शिक्षक देवदत्त चुबे, सदानंद तावडे, मधुकर पवार, संभाजी वळंजू, आपटे मॅडम, शिक्षक सचिन धुरी, खराडे मॅडम,भडगाव उपसरपंच बाबी गुरव,अतुल कल्याणकर,राजू मुंज,संतोष सावंत तसेच शाळेतील सर्व आजी माजी विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.