Kokan: शिमगोत्सवानिमित्त समुद्रात फिरण्यास गेलेली होडी बुडाली;१२ मुली सुखरूप

1
75
होडी बुडाली;१२ मुली सुखरूप,
शिमगोत्सवानिमित्त समुद्रात फिरण्यास गेलेली होडी बुडाली;१२ मुली सुखरूप

दर्यावर्दी तरूणांनी बचावासाठी धाव घेतली आणि मुलींना तत्काल सुरक्षितपणे दुसर्‍या नावेत घेतले.

रत्नागिरी (न्युजनेटवर्क)– रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथे दरवर्षी शिमगोत्सवानिमित्त परिवारातील लोकांना खाडीभागातून समुद्रात फिरण्यास नेण्याची परंपरा आहे. शिमग्याला आणि गुढीपाडव्याला होड्यांतून फिरण्यास नेले जाते. कालदेखील असेच समुद्रात फिरण्यासाठी काही नौका गेल्या आणि त्यात एक नौका १२ मुलींना घेवून पर्यटनासाठी आली होती. समुद्राचे पाणी खवळले होते, लाटा उसळत होत्या त्यामुळे खाडीकाठीच पर्यटन करून परतताना १ होडी बुडाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-रा-काँ-पवार-पक्षाच्या-सा/

पौर्णिमेचा ताण असल्याने समुद्राचे पाणी खवळले होते, लाटा उसळत होत्या. त्यामुळे खाडीकाठीच पर्यटन करून परतताना १ होडी बुडाली. त्यात १२ मुली होत्या. होडी पलटल्यानंतर तत्काल शेजारीच असलेल्या वरवडे गावच्या दर्यावर्दी तरूणांनी बचावासाठी धाव घेतली आणि मुलींना तत्काल सुरक्षितपणे दुसर्‍या नावेत घेतले.

यावेळी काही मुलींना पोहता येत होते असे म्हटले जाते. समुद्र आणि खाडीकाठी राहणार्‍या या मुली दर्यावर्दी कुटुंबातील असल्याने त्यांना बालपणापासून खाडीत पोहोण्याचा सराव आहे. त्यामुळे त्या घाबरल्या नाहीत. मात्र लाटांमुळे त्यांना त्रास झाला असे म्हटले जाते. उपचारासाठी त्यांना मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काल वरवडे येथील ग्रामस्थांनी नेले आणि सायंकाळी त्यांना घरीही आणले. आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना वरवडे गावातील तरुणांनी सांगितले की, ‘प्रसंग बाका होता… पण गणपती बाप्पाच्या कृपेने आमची मुले वाचली’. काहीही घडले असते अशी भीती त्यांनी व्यक्त केली

1 COMMENT

  1. […] कणकवली-: शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून मोठा झालास काय? अशी धमकी देत होळीचे पैसे दिले नाहीस तर तुझ्या गाड्या जाळून टाकणार व ठार मारणार अशी धमकी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते राजू राठोड व रिमेश चव्हाण यांनी दिली अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. या तक्रारीनुसार राजू राठोड व रिमेश चव्हाण यांच्या विरोधात कणकवली पोलिसात 504, 506, 34 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिमगोत्सवानिमित्त-समुद… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here