शिरगावI दिनांक : ३ डिसेंबर २०२४
ज्ञानाचा खजिना साठवण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे साधन म्हणजे ग्रंथालय, आणि त्या ग्रंथालयाचे सजग संवर्धन करणारे दानशूर हात हे खऱ्या अर्थाने समाजाला उजळवणारे दीपस्तंभ असतात. अशा एका प्रकाशस्तंभाची भूमिका बजावत, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. उदयसिंह रावराणे सर यांनी आपल्या उदार मनाने शाळेच्या ग्रंथालयासाठी ₹ 10,500/- किंमतीचे लोखंडी पुस्तक कपाट देणगी स्वरूपात प्रदान केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-माहेरी-आलेल्या-विवाहिते/
विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची क्षितिजे अधिक विस्तृत व्हावीत व ग्रंथालयाचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने सरांनी दिलेली ही देणगी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उदार दातृत्वामुळे ग्रंथालय अधिक सुसज्ज होईल आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग अधिक सुलभ बनेल.
संस्थेचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग व विद्यार्थी परिवार त्यांच्या या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो श्री. उदयसिंह रावराणे सरांच्या या अमूल्य योगदानामुळे ज्ञानदीपाच्या तेजस्वी ज्योतीला नवी उंची प्राप्त झाली आहे. त्यांचे योगदान ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे! शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी पुन्हा एकदा आभार व धन्यवाद मानले.
[…] […]