शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अँटी-रॅगिंग सेल च्या वतीने पोस्को कायदा, सायबर गुन्हे आणि पीडित भरपाई योजना याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. अर्चना गवाणकर आणि अँड.चैताली चेतन मुंज यांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा, पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, तसेच विद्यार्थ्यांनी जागरूकता कशी बाळगावी, यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्हा-क्रीड/
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मेघा बाणे, प्राचार्य. डॉ. राजेश जगताप, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.चंद्रशेखर बाबर, विभागप्रमुख प्रा.अमर कुलकर्णी आणि डॉ. अमोल उबाळे यांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम जागरूकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस. डी. कदम आणि प्रा. पी. पी. राणे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत यांनी आयोजकांचे कौतुक केले.