Kokan: शिवसेना उ. बा. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपा पक्ष प्रवेश दिवसेंदिवस लांबणीवर?

0
40
सामंत बंधूं,-राजन-साळवी
अखेर सामंत बंधूंच्या नेतृत्वाखाली राजन साळवींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट !
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l राजापूर –

शिवसेना उ. बा. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा भाजपा पक्ष प्रवेश दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. यापुर्वी माजी आ. साळवी १२ जानेवारी, त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी पक्ष प्रवेश करणार अशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी माजी आ. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबात कोणतीच चर्चा झाली नसल्याचे जाहिर केल्याने पक्ष प्रवेशासाठी भाजपाने साळवी यांना चांगलेच लटकवल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरू आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-समृद्धी-महामार्ग-प्र/

दरम्यान माजी आ. साळवी यांच्या सोबत भाजपामध्ये येण्यासाठी उ. बा. ठाकरे गटातील अन्य कोणतेही पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक नसल्याने व तशी स्पष्ट कल्पना त्यांनी साळवी यांना दिल्याने साळवींसोबत कुणीच नाही हे भाजपाच्या लक्षात आल्याने भाजपाकडून आता साळवींना पक्ष प्रवेशासाठी वेटींगवर ठेवल्याची चर्चा होत आहे.विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर माजी आ. राजन साळवी उ. बा. ठाकरे गटात नाराज असल्याचे बोलले जात होते. खुद्द साळवी यांनी मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत आपली नाराजी बोलून दाखविली होती. यावेळी त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यामुळे आपला पराभव झाल्याची तक्रार ठाकरेंकडे केली होती. यावेळी ठाकरे यांनी साळवी यांच्या तक्रारीची फारशी दखल न घेता, तुंम्हाला कुठं जायचं तर जा असे सांगून साळवींना मातोश्री बाहेरचा रस्ता दाखविला होता.

यानंतर साळवी यांनी मतदार संघात दौरा करून कार्यकर्त्यांशीही पक्ष प्रवेशाबाबत चर्चाही केल्या होत्या. दरम्यान अनेकांनी निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तर असलेल्यानी साळवींसोबत येण्यास नकार दिला आहे अशीही चर्चा आहे.

त्यानंतर साळवी हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगुन साळवी यांनीही या चर्चांना दुजोरा दिला होता. त्यावेळी साळवी हे १२ जानेवारी रोजी भाजपाच्या नाशिक येथील अधिवेशनात प्रवेश करणार असे सांगितले जात होते. त्यावेळी त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही, त्यानंतर साळवी ३ फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्तही प्रसिध्द झाले होते. मात्र तीही तारिख हुकली आहे. त्यामुळे साळवींच्या प्रवेशाबाबत सध्या तरी तारिख पे तारिख अशीच अवस्था आहे.

तर उ. बा. ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुर्वीच मोठया प्रमाणावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने व सध्या उ. बा. ठा. गटात कार्यरत असलेल्या अनेक निष्ठावान आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साळवींसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्याने सोबत कुणीच नसल्याने साळवांना सध्या तरी भाजपाने प्रवेशासाठी लटकावल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here