⭐तर शिवसेना पक्षाने नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख म्हणून श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांची केली नियुक्ती ⭐शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी दोन्ही नेत्यांचे भ्रमणध्वनीद्वारे केले अभिनंदन
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय आंग्रे हे पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणिक राहिले व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याचा यथोचित मान सन्मान राखून सर्वांना सोबत घेऊन संघटना अबाधित ठेवली त्यामुळे त्यांना शिवसेना पक्ष नेतृत्वाकडून जिल्हाप्रमुख पदावरून उपनेते पदी बढती देण्यात आली.तसेच ज्यांचे पक्ष संघटन मजबूत आहे.ज्याच्या नावाचा उल्लेख सिंधुदुर्ग जिल्ह्यात “दत्ता तिथे सत्ता” असा केला जातो.संघटन कौशल्य मजबूत माजी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार मा.ना.नारायण राणे यांच्या घरातील विश्वासू सदस्य श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांना शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.हे दोन्ही नेते सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करणारे आहेत यात तीळमात्र शंका नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-दिवाळी-सणाच्या-लगबगीला-व/
या दोन्ही नेत्यांना शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी या दोन्ही नेत्यांना नियुक्ती पत्रके देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख श्री.रविंद्र फाटक,शिवसेना पक्षनिरीक्षक श्री.बाळा चिंदरकर,शिवसेना नवनिर्वाचित उपनेते श्री.संजय आंग्रे, नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.देवदत्त उर्फ दत्ता सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी या दोन्ही नेत्यांना भ्रमणध्वनीद्वारे भावी वाटचलीसाठी भगव्यामय शुभेच्छा दिल्या.