कुडाळ- शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,श्री.योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या सहकार्यातून शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड.श्री.यशवर्धन राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात विद्यार्थी मदत कक्षाची स्थापना करणार.https://sindhudurgsamachar.in/६-जून-रोजी-होणाऱ्या-शिवरा/
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,श्री.योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या सहकार्यातून शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड श्री. यशवर्धन राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कुडाळ मध्यवर्ती संपर्क कार्यालयात विद्यार्थी मदत कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या विद्यार्थी कक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तसेच कॉलेज युवक युवती यांना शासकीय दाखले उदा. उत्पन्न दाखला,नॉन क्रिमेलियेर,राष्ट्रीयत्व दाखला,जातीचा,वय अधिवास दाखला आदी शासकीय दाखले त्वरित उपलब्ध करून दिले जातील विद्यार्थी,कॉलेज युवक युवती यांनी लागणारी आवश्यक कागदपत्रे फोटो पॅनकार्ड,आधारकार्ड,शाळा सोडल्याचा दाखला, रेशकार्ड,तलाठी अहवाल किंवा शासकीय कर्मचारी किंवा निवृती वेतन धारक असल्यास फॉर्म १६ आदी,रहिवाशी दाखला घेऊन शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. अन्य कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असल्यास आपणास तिथे सूचित केले जाईल.