शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती : नितीन मांजरेकर
वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या दि. २९ व ३० आँक्टोंबर असे दोन दिवस वेंगुर्ले शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे खास उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेनाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ले तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, मितेश परब, युवा शहर प्रमुख संतोष परब, बाळू सावंत आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगाबॉईजचा-९-दिवस-९-किलो/
उद्या दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता वेंगुर्ले वाचनालय येथे शिवसेना युवक शहरप्रमुख संतोष परब यांचे आयोजनाखाली जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा होणार आहे. तर दि. ३० आँक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व तज्ञ डॉक्टरांच्या टिम मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी मध्ये रक्त चाचणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, स्त्री रोग चिकीत्सा, नेत्र तपासणी, करण्यात येऊन मोफत औषध पुरवठा केला जाणार आहे. या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड, आयुष्मान भारत PMJAY कार्ड नोंदणीचे काम मोफत करुन देण्यात येईल.
दरम्यान याच दिवशी सकाळी ९ वाजता वेंगुर्ले येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे सुशोभिकरणाच्या विविध विकासकामांचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ वेंगुर्ले शहर, ग्रामीण भागातील मान्यवर पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे. तर सकाळी १० वाजता-शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसास शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी वेंगुर्ला तालुका शिवसेनेत विविध पक्षप्रवेश स्वागत आणि वेंगुर्ले तालुक्यासाठी दोन रुग्णवाहिका लोकार्पण असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून शिवसेनेतर्फे आयोजीत विविध कार्यक्रमांचा लाभ वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील जनतेने घ्यावा. असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर व शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.