Kokan: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या, ट्रेनखाली उडी घेऊन आयुष्य संपवलं

0
49
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या, ट्रेनखाली उडी घेऊन आयुष्य संपवलं
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या, ट्रेनखाली उडी घेऊन आयुष्य संपवलं

मुबंई- शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होते आहे. शिवसेनेचे माजी नेते सुधीर मोरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. विक्रोळी पार्क साईट परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनाने एक निष्ठावान शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे असं म्हणत माजी मंत्री अनिल परब यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-गोवा-महामार्गाच्य/

काम असल्याचं सांगून बाहेर पडले

रेल्वे रुळावर ३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह सापडला. गुरुवारी त्यांना एक फोन आला. त्यानंतर मी वैयक्तिक कामासाठी बाहेर चाललो आहे असं त्यांनी त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं. त्यांनी त्यांच्या बॉडीगार्डला आपल्या बरोबर नेलं नव्हतं. तसंच गाडी न घेता ते रिक्षाने बाहेर पडले होते. त्यानंतर घाटकोपर आणि विद्याविहारच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर त्यांनी जीव दिला. रात्री साडेअकराच्या सुमारास ते रेल्वे रुळांवर झोपले. लोकल ट्रेनच्या मोटरमनला कुणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं लक्षात आलं. त्याने वेग कमीही केला होता. मात्र काही उपयोग झाला नाही. लोकल त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुधीर मोरे हे उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक होते. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुखही होते. सुधीर मोरे हे मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईट इथले शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. त्यांची वहिनी देखील माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here