किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे करणार- रविंद्र फाटक.
रत्नागिरी (प्रतिनिधी) -: रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आणि आढावा बैठक रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती.यावेळी माजी आमदार तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-हत्तींमुळे-घरांचे-नुकस/
या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले शिवसेना संघटना सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. संघटना भक्कम करून वाढविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरले असून तुम्ही ही कामाला लागा असे आहावान यावेळी रवींद्र फाटक यांनी केले. किरण सामंत लोकसभेचे उमेदवार द्या ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे आपण मागणी करणार असल्याच त्यांनी सांगितल.
यावेळी जिल्हा प्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम, उपजिल्हा प्रमुख प्रकाश साळवी, उपजिल्हा प्रमुख राजू कुरूप, महिला उपजिल्हा प्रमुख विनया गावडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन पाटील, महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू म्हाप, संगमेश्वर तालुका प्रमुख प्रमोद पवार, लांजा तालुका प्रमुख गुरु देसाई, चिपळूण तालुका प्रमुख बापू आयरे, राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले, महिला तालुका प्रमुख नेत्रा शिंदे, रसिका मेस्त्री, शुभांगी डबरे, महिला शहर प्रमुख स्मितल पावसकर, युवा सेना जिल्हा प्रमुख केतन शेट्ये, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख अल्ताफ संगमेश्वरी, दीपक नागले, मनोहर बाईत, शिरगांव सरपंच फरीदा काजी, यांच्या सहित, रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे बेसिक, महिला आणि युवा सेना जिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग प्रमुख, शहरप्रमुख, उपशहर प्रमुख तसेच सर्व माजी -लोकप्रतिनिधी (जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, आदी उपस्थित होते.